Ad will apear here
Next
पुण्यात २२ मार्चपासून रस्ट पेंटिंगचे प्रदर्शन
पुणे : चित्रकारितेमधील वेगळी शैली असलेल्या रस्ट पेंटिंगचे प्रदर्शन २२ ते २४ मार्च २०१९ या कालावधीत शनिवारपेठेतील सुदर्शन कलादालनात सकाळी ११ ते दुपारी दोन व सायंकाळी चार ते रात्री आठ दरम्यान भरविण्यात येणार आहे. रस्ट पेंटिंग ही शैली पुण्यातील कलाकार विक्रम मराठे यांनी विकसित केली आहे.

या विषयी माहिती देताना मराठे म्हणाले, ‘कागदावर लोखंडाचे तुकडे गंजवून केलेली चित्रे म्हणजे रस्ट पेंटिंग. अशा प्रकारची चित्रे हे कागदावरच काढली जातात. ही चित्रे काढण्यासाठी विशिष्ट पद्धतीने लोखंड गंजवून त्याचा गंज कागदावर उतरविला जातो.’

या पेंटिंगची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘आधुनिक चित्रकारिता ही आव्हानात्मक आहे. यामध्ये प्रवाहत असणारे अनेक जण आहेत; पण नेमक हेच मला नको होते. त्यामुळे पारंपरिक चित्रशैली वा चित्रकारिता शिकल्यावरही मला नवीन काही करण्याचा ध्यास लागला होता. एक दिवस आमच्या फ्रॅब्रिकेशनच्या वर्कशॉपमध्ये बसलो असताना गंज लागलेले लोखंड बघून या पासून चित्रे काढता येतात का असा विचार केला. त्यातून वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजेच १९९४ साली मी पहिले चित्र काढले. प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर बर्वे यांनी मला या नव्या शैलीबद्दल प्रोत्साहन दिले. यातूनच पुढे ही चित्रशैली विकसित झाली. सध्या जगात अशा प्रकारची चित्रे काढणारा मी एकमेव कलाकार आहे.’

काळ हा या चित्रशैलीचा गाभा आहे. रस्ट पेटिंग्समध्ये  लोखंडाला जसा काळानुरूप गंज चढतो अगदी तशाच पद्धतीने गंजाचे चित्रिकरण केले जाते. गंज हा इतिहासाची साक्ष देणारा असतो आणि ही चित्रशैली त्याचेच प्रतीक आहे. त्यामुळे या शैलीला विषयाची मर्यादा नसल्याचे मराठे यांनी सांगितले. मराठे यांनी अशा प्रकारची ४०हून अधिक चित्रे काढली असून, केवळ गंजच नव्हे, तर या चित्रांमध्ये पतंगांच्या कागदांचा रंगही उतरविला असल्याचे ते म्हणाले.

प्रदर्शनाविषयी :
कालावधी :
२२ ते २४ मार्च २०१९
वेळ : सकाळी ११ ते दुपारी दोन आणि सायंकाळी चार ते रात्री आठ.
स्थळ : सुदर्शन कलादालन, शनिवारपेठ, पुणे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZOEBY
Similar Posts
आंतरशालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत पुण्यातील ३२ शाळांमधील चौदाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये पहिली ते दहावीतील मुलांचा समावेश होता.
अनिल नेने यांचे वॉटरकलर आर्टवर्कचे प्रदर्शन औंध : आर्किटेक्ट आणि आर्टिस्ट अनिल नेने यांचे वॉटरकलर आर्टवर्कचे प्रदर्शन २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत औंध येथील रिलायन्स मार्टच्या बाजूला पीएन गाडगीळ अँड सन्सच्या आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. सकाळी ११.३० ते संध्याकाळी ८.३० या वेळेत हे प्रदर्शन सुरू असेल.
‘श्यामरंग’मध्ये शास्त्रीय-सुगम गायनाची जुगलबंदी पुणे : ‘मोगरा फुलला, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी..., सहेला रे..., मोरा पिया मोसे बोलत नाही.., हे सुरांनो चंद्र व्हा... हमे तुमसे प्यार कितना... अशा ‘एकसे एक बढकर’ राग, गीत, अभंग, भावगीतातून रविवारची सकाळ सप्तसुरांनी न्हाऊन गेली. दुपारी गायलेल्या मालकंस रागातील बंदिशी अन अजरामर गीते यांची रंगलेली जुगलबंदी
पुण्यात कलानुभूती चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन पुणे : नवोदित व हौशी कलाकारांनी काढलेली विविध प्रकारची कल्पनाचित्रे, निसर्गचित्र, व्यक्तिरेखा आणि त्यातील विविध भाव व नैसर्गिकरित्या तयार झालेल्या विविधांगी छटा पुणेकरांनी कलानुभूती चित्रकला प्रदर्शन व स्पर्धेत अनुभवल्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language